Election :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार! महापालिका निवडणुकीचा आज सुप्रीम फैसला?

विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. कोरोना संकट काळ आणि ओबीसी आरक्षणाबाबत रखडलेली याचिका यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता ही सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आजची सुनावणी त्याच अनुषंगाने जास्त महत्त्वाची आहे. कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यानंतर पुढच्या महिन्यातच निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडणार आहे. अर्थात याबाबत सुप्रीम कोर्टाचा फैसला काय असणार? ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील डॉ. देवदत्त पालोदकर यांनी पंजाब निवडणुकीचा दाखला देत प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतंच पंजाबच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशाचप्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने निर्णय दिला होता की, प्रभागरचनेसाठी तुम्हाला निवडणुका रखडवता येणार नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्ट केलं की, तु्म्हाला प्रभाग रचनेच्या आधारे निवडणुका थांबवता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने पंजाबबाबत तसे आदेश देवून आता निवडणुका झाल्या आहेत”, असं वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात किती निवडणुका प्रलंबित?

29 महापालिका
32 जिल्हा परिषदा
244 नगरपालिका
289 पंचायत समिती
41 नगर पंचायत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here