कल्याण, बदलापूरमध्ये १२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी

मुंबईच्या वेशीवर असेलल्या कल्याण, बदलापूरमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे कल्याण, बदलापूरमध्ये तब्बल १२ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

अवघ्या चार तासात बदलापुरात १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसंच पूरस्थिती निर्माण झाल्यास १२ हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था पालिका प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here