शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील १५०० सदस्यांनी एकचवेळी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत हा भव्य प्रवेश झाला. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनीही पक्षबदल केले आहेत. त्यानंतर आता एवढी मोठी गळती उबाठा शिवसेनेत झाली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे.