नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत धक्कादायक घटना घडली आहे. येथील 16 वर्षीय ख्वाहिश देवराम नागरे या विद्यार्थ्याने सोमवारी आपले जीवन संपवले. शिक्षणाच्या दबावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे समजते. ख्वाहिशने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तत्पूर्वी त्याने पालकांसाठी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे.
ख्वाहिशने चिठ्ठीत लिहिले की, “सॉरी आई-बाबा, मी हे करू शकणार नाही.. मी दीड आठवड्यापासून विचार करत होतो की मी हे करू शकणार नाही. माफ करा आणि मला सर्व काही वेळेवर दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आई-बाबा पण तेवढे पुरे झाले. मी आता ते करू शकत नाही. तुमची शेवटची भेट घ्यायची इच्छा होती. मात्र, मला भेटता येणार नाही, दीदीची काळजी घ्या. बाय.”
दरम्यान, ख्वाहिशला नुकतेच त्याच्या पालकांनी वैद्यकीय प्रवेशसाठी असलेल्या ‘नीट’च्या तयारीसाठी बालाघाटवरून नागपूरला पाठवले होते. तो हिलटॉप भागातील हॉस्टेलवाला या वसतिगृहात राहायला होता.