ठाण्यात २१ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात २१ वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाल्याचा संशय आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या या २१ वर्षीय तरुणाचा सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
२२ मे 2025 रोजी साठी उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे. २३ मे २०२५ रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. यानंतर २४ मे २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
२४ तासांत कोरोनाचे ३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीही केईएममधील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे . महिनाभरात राज्यात कोरोनाचे १७७ रुग्ण आढळले आहेत. जगभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्तेय वाढ झालीय.. सिंगापूर आणि हॉंगकॉंग या दोन्ही ठिकाणी १४ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.