हैदराबादमध्ये नागोले स्टेडियममध्ये मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताना 25 वर्षीय तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत युवकाचं नाव गुंडला राकेश असून, तो खम्मम जिल्ह्यातील तल्लाडा गावचे माजी उपसरपंच गुंडला वेंकटेश्वरलू यांचा मुलगा होता. हैदराबादमधील एका खाजगी कंपनीत तो नोकरी करत होता. बॅडमिंटन खेळताना अचानक अस्वस्थ झाल्यावर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.