कारमध्ये लॉक होऊन चार चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी बंद कारमध्ये गुदमरून चार मुलांचा मृत्यू झाला. विजयनगरम कॅन्टोन्मेंट अंतर्गत द्वारपुडी गावात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांखालील चार मुले खेळता खेळता पार्क केलेल्या गाडीमध्ये गेले. गाडीचे दरवाजे बंद झाल्यामुळे ही मुलं आतमध्येच अडकली.

सकाळपासून मुलं दिसली नाहीत म्हणून पालकांनी शोध सुरू केला तेव्हा ही घटना उघडकीस आली. यानंतर, स्थानिक महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये मुलांचे मृतदेह आढळले. रविवारी सकाळी ८ वर्षांचा उदय, ८ वर्षांची चारुमती, ६ वर्षांची करिश्मा आणि ६ वर्षांची मनस्वी खेळायला बाहेर गेले होते. चारुमती आणि करिश्मा बहिणी होत्या, तर इतर दोघे त्यांचे मित्र होते. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला.

त्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांचे दरवाजे लॉक नसल्यामुळे, मुलांनी ते उघडले आणि गाडीत चढले. मग दरवाजे चुकून लॉक झाले आणि ते आत अडकले. गुदमरल्यामुळे चौघांचाही मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here