म्यानमारमध्ये भूकंप झाल्यानंतर आता जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. जपानच्या क्यूशू भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये 6.0 रिश्टर स्केलचा धक्के जाणवले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे संत वाजण्याच्या सुमारास जपानच्या क्यूशू राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र क्यूशू बेटावर होते.
जपानमध्ये या भूकंपाचे धक्के बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. जपानध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असतात. काल अचानक भूकंप झाल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धक्के जाणवू लागताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी त्या ठिकाणी झाली नसल्याचे समजते आहे. क्यूशू हे जपानमधील तिसरे सर्वात मोठे बेट आहे आणि भूकंपाच्या क्रियाकलापांसाठी ओळखले जाते. स्थानिक प्रशासनाने रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि संभाव्य भूकंपांसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.
जपान सरकारने नुकताच एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, भूकंपप्रवण जपानच्या अर्थव्यवस्थेला त्यांच्या पॅसिफिक किनाऱ्याजवळ दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या मोठ्या भूकंपाच्या घटनेत १.८१ ट्रिलियन डॉलर्सपर्यंतचे नुकसान होऊ शकते, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. जपान सरकारच्या या अहवालात इशारा देण्यात आला आहे की, या अपेक्षित भूकंपामुळे विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, शेकडो इमारती कोसळू शकतात आणि सुमारे ३ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.