मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८० नगरसेवकांनी पक्ष बदलला आहे. शिवसेना आणि भाजप पक्षात मोठ्या संख्याने इनकमिंग सुरु आहे. पक्ष सोडणारे सर्वाधिक नगरसवेक हे शिवसेना ठाकरे पक्षाचे आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. या पक्षातील 36 माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले आहेत. निवडणूका घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आगामी काळात पक्षप्रवेश अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.