ब्रिटनमधील न्यूझीलंडचे राजदूत फिल गॉफ यांना पदावरून हटवण्यात आले आहे. गॉफ यांनी बुधवारी लंडन येथे एका चर्चेदरम्यान दुसर्या महायुद्धाबद्दलच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. गॉफ यांच्या वक्तव्यानंतर न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विंस्टन पीटर्स यांनी त्यांची स्थिती अस्थिर असल्याचे सांगत त्यांना परत बोलावले आहे. दरम्यान गॉफ यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गॉल्फ हे न्यूझीलंडचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आहेत. गॉफ हे यापूर्वी परराष्ट्र मंत्री आणि ऑकलंडचे महापौर देखील राहिले आहेत.
फिल गॉफ यांनी रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेची तुलना ही १९३८ सालच्या म्यूनिक कराराशी केली होती, ज्यामुळे अडॉल्फ हिटलरला चेकोस्लोवाकिया ताब्यात घेण्याचा मार्ग खुला झाला होता. गॉफ यांनी विंस्टन चर्चिल यांनी या करारावर टीका केल्याचे देखील नमूद केले.
दरम्यान न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विंस्टन पीटर्स यांनी लंडन येथील राजदूतांनी केलेले वक्तव्य खूपच निराशाजनक असल्याचे विधान केले आहे. ते न्यूझीलंडचे प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत याची त्यांनी काळजी घेणे आवश्यक होते असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते म्हणाे त्यांचे हे विधान ही न्यूझीलंडची अधिकृत भूमिका नाही.