सुरज चव्हाणच्या ‘झापुक झपूक’चं चित्रीकरण पुर्ण, केदार शिंदेंनी अशी दिली माहिती

गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर डिसेंबर २०२४च्या अखेरीस चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आणि आता चित्रपटाचं चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे.

केदार शिंदे व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “बाप्पाच्या आशीर्वादाने सूरज चव्हाणच्या म्हणजेच ‘झापुक झुपूक’ या धमाल चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं. एका बुक्कीत टेंगूळचं…तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असून दे…२५ एप्रिलपासून भेटूया आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!”

या व्हिडीओमध्ये केदार शिंदे सूरज चव्हाणला पॅकअप म्हण, असं बोलत आहेत. तेव्हा सूरज म्हणतो, “गॅपअप.” यामुळे सेटवर एकच हशा पिकला. त्यानंतर सूरज आणि ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची टीम जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. केदार शिंदेंनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहते ‘झापुक झुपूक’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तसंच काही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here