काय सांगता, या अन्नपदार्थांचे फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवल्यास होते विष!

नेहमीच सांगितले जाते की, आरोग्यासाठी ताजे अन्न खावे. पण तरीही काही जण फ्रीजमधले साठवलेले अन्न गरम करून खातात. पण यामुळे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. सर्वच अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यावर धोकादायक होते असे नाही पण काही अन्नपदार्थ फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यावर त्यांचे सेवन हे आरोग्याला धोकादायक ठरते. जाणून घेऊयात हे पदार्थ कोणते?

अंडे

अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे सर्वांना माहित आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, अंड्यापासून बनवलेले पदार्थ जसे की ऑम्लेट, भुर्जी इत्यादी फ्रिजमध्ये ठेवू नयेत. कारण त्यात बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात, ज्यामुळे तुमचे पचन बिघडू शकते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यास मनाई आहे, कारण त्यामध्ये असलेले नायट्रेट धोकादायक कंपाऊंड नायट्रो माइन्समध्ये बदलते. ज्यामुळे तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

बटाटे

बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत असा सल्लाही दिला जातो, कारण ते जास्त काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने बटाट्यांमध्ये असलेले स्टार्च ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

शिजवलेला भात 

शिजवलेले भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून ते खाऊ नये असा सल्लाही दिला जातो. कारण शिजवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात, जे पुन्हा गरम केल्यानंतरही थांबत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here