काय चालंलय काय! हम्पी येथे पर्यटक महिलेसह भारतीय महिलेवर बलात्कार

कर्नाटकातील हम्पी येथे इस्रायलच्या आणि भारती महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री हा गुन्हा घडला. यावेळी या महिलांसह तीन पुरूष पर्यटकही उपस्थित होते. यापैकी एका पुरूष पर्यटकाचा मृतदेह पोलिसांना तलावात आढळून आला आहे. इस्त्राईलची महिला २७ वर्षीय आणि भारतातील होम स्टे मालक असलेल्या महिलेचे वय २९ वर्ष होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास सानापूर तलावाजवळ ही घटना घडली. इस्रायलची महिला पर्यटक, अमेरिकेतील एक पुरूष पर्यटक, ओडिशा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक पुरूष पर्यटक त्यांच्या होम स्टे मालक महिलेसह याठिकाणी भटकंतीसाठी आले होते. सर्वजण रात्री तलावाशेजारी संगीताचा आनंद घेत थांबले होते.

पर्यटक थांबलेल्या ठिकाणी रात्री दुचाकीवर बसलेले तीन आरोपी तिथे आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर जाण्याचा रस्ता विचारला. होम स्टे मालक स्थानिक असल्यामुळे तिने जवळपास पेट्रोल पंप नसल्याचे म्हटले. त्यानंतर दुचाकी चालकांनी त्यांच्याकडे पेट्रोलची मागणी केली, थोड्या वेळाने ते पर्यटकांकडे पैसे मागू लागले. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा दुचाकीस्वार आक्रमक झाले आणि त्यांनी पर्यटकांशी गैरवर्तन केले. महिला पर्यटकांना त्रास देत असताना इतर तीन पुरूष पर्यटक आरोपींना रोखण्याचा प्रयत्न करत होते.

या झटापटीत आरोपींनी तीनही पुरूष पर्यटकांना बाजूलाच असलेल्या कालव्यात ढकलले. डॅनियल आणि पंकजला पोहायला येत असल्यामुळे ते पोहत बाहेर पडले. पण ओडिशाचा पर्यटक बिबास आढळून आला नाही. इतर दोघे जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी शहराचे पोलीस निरीक्षक प्रकाश माले आणि त्यांच्यासह इतर पोलिसांनी श्वान पथकाला बरोबर घेत तपास सुरू केला.लवकरच आरोपींना पकडले जाईल. महिलेच्या तक्रारीनंतर आम्ही तात्काळ कारवाई सुरू केली आहे, असे ते म्हणाले. होम स्टे मालक पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, तीन आरोपींनी त्यांच्याशी हाणामारी केली. तीन पर्यटकांना कालव्यात फेकले. तसेच इस्रायलची महिला आणि तिच्यावर बलात्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here