हल्ली मालिका, चित्रपट, नाटक यातला एक महत्वाचा घटक म्हणजे नृत्य. मालिकांमध्ये सुद्धा हल्ली अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने नृत्य पाहायला मिळतात. चित्रपटात तर नृत्य असतेच, आणि नाटकांमध्ये सुद्धा नृत्याचा समावेश असतो. यासाठी नृत्यदिग्दर्शक हा खूप महत्त्वाचा घटक आहे. नृत्य दिग्दर्शन या क्षेत्रात सुद्धा मोठी संधी आहे. या क्षेत्रात काम करत असताना येणारी आव्हानं नेमकी काय आहेत, प्रत्येक माध्यमनुसार नृत्य कसं बदलतं, चित्रपटासाठीचं नृत्य दिग्दर्शन कसं असतं याची उत्तरं आणि बरच काही जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका दीपाली विचारे यांचा पॉडकास्ट नक्की पहा.