भारतविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा सामना रंगला. या अंतिम आणि शेवटच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत तब्बल २५ वर्षांपूर्वीचा बदला घेतला. भारताने तब्बल १२ वर्षांनंतर चॅम्पियन ट्राॅफी जिंकण्यात यश मिळवले.
पण या सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्तीची घोषणा करेल अशा चर्चांना उधाण आलं होतं. सामन्यानंतर रोहितने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चावर पडदा टाकला आहे. कर्णधार रोहितने स्वतः त्याच्या निवृत्तीबद्दल एक निवेदन जारी केले आहे.
भविष्यासाठी कोणतीही योजना नाही. जे काही घडत आहे ते सुरूच राहील. मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाही. आतापासून कृपया अफवांना महत्त्व देऊ नका.” खुद्द रोहित शर्माने या अफवांवर पडदा टाकला.

विजय संपूर्ण देशाला समर्पित
कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय संपूर्ण देशाला समर्पित केला. तो म्हणाला की,” जेव्हा टीम इंडिया खेळत असते तेव्हा संपूर्ण देश त्याला पाठिंबा देत असतो. रोहित शर्माने श्रेयस अय्यरला सायलेंट हिरो म्हटले. मधल्या फळीत येताना अय्यरने संघासाठी महत्त्वाची खेळी केली. आजही त्याने अक्षर पटेलसोबत महत्त्वाची भागीदारी केली. श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याने अक्षर पटेलसोबत ६१ धावांची भागीदारी करून भारताला दबावाच्या परिस्थितीतून सावरण्यास मदत केली.