आमदार रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसला रामराम! हाती घेणार शिवधनुष्य

पुण्यातील कसबा मतदारसंघातून निवडून येत जायंट किलर ठरलेले, काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता रविंद्र धंगेकरांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली..त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली असल्याचे सांगितले आणि आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक होणार असून त्यानंतर अपेक्षित निर्णय घेतला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसवर नाराज नाही पण…

काँग्रेस सोडली मात्र काँग्रेसवर कधीच नाराजी नव्हती अशी भावना धंगेकर यांनी व्यक्त केली. काँग्रेस सोडण्याचा निर्णय हा कार्यकर्ते आणि मतदारांमुळे घेतला असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, सत्तेत असल्याशिवाय काम होत नाही ही कार्यकर्त्यांची आणि मतदारांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मला भरभरून दिले. असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें, मंत्री उदय सामंतांनी अनेकदा फोन केले. त्यांनी आमच्यासोबत या हे सांगितले. मी त्यांच्याकडे कोणतेही पद मागितले नाही. मी महानगर पालिका निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आज सायंकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे त्यानंतर निर्णय घेतला जाईल. थोडक्यात पालिका निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय.

काही दिवसांपूर्वी, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या एका व्हायरल स्टेटसने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. त्यांनी आपल्या स्टेटसला गळ्यात भगवं उपरणं घातलेला फोटो ठेवला होता. तसेच, त्यावर ‘तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here