येत्या काही दिवसांवर होळीचा सण आला आहे. या रंगाच्या सणामध्ये रंगांसोबत खेळताना, सणाचा आनंद लुटताना तुम्हाला काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. रंग लागण्यापूर्वी आणि रंग लागल्यानंतर काळजी घेतल्यास तुम्ही त्वचेवर रंगांचे डाग राहणार नाहीत आणि कोणती ॲलर्जी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया काय काळजी घ्यावी.
रंगांसोबत खेळण्यापूर्वी, तुमच्या त्वचेवर नारळ, बदाम किंवा तीळ यांसारख्या तेलाचा मोठा थर लावा. त्यामुळे रंग त्वचेला जास्त चिकटत नाहीत आणि रंग खेळल्यानंतरही त्वचेवरील रंग सहज जाण्यास मदत होते.
हायड्रेशन महत्त्वाचे आहे; कोरडी त्वचा जास्त रंग शोषून घेते म्हणूनजाड बॉडी बटर किंवा तूप-आधारित मॉइश्चरायझरने अंग चांगले मॉइश्चरायझ करा, कोपर, गुडघे आणि पायांवर अधिक लक्ष द्या.
रंग खेळण्यापूर्वी चांगल्या रिझल्टसाठी SPF 50 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा.
ओठांची काळजी घेण्यास विसरू नका; ओठ मऊ आणि रंगांपासून मुक्त ठेवण्यासाठी तूप किंवा पौष्टिक लिप बामचा जाड थर लावा.
केसांना रंगांपासून संरक्षणाचीदेखील आवश्यकता असते, म्हणून कोरडेपणा टाळण्यासाठी कोमट तेलाने तुमच्या टाळूची मालिश करा आणि जास्त केसांचा संपर्क टाळण्यासाठी वेणी किंवा अंबाडा बांधा.
रंग खेळताना त्वचेची ॲलर्जी आणि जळजळ टाळण्यासाठी फुले, औषधी वनस्पती आणि हळदीपासून बनवलेले नैसर्गिक रंग निवडा.
स्वत:ला हायड्रेट करायला विसरू नका; इथून तिथून नाचण्यात आणि धावण्यात, हायड्रेशनकडे दुर्लक्ष होते. तसेच ताज्या आणि चमकदार त्वचेसाठी दिवसभर पाणी पित राहा.
जर कोणी तुमच्या चेहऱ्यावर रंग लावला तर तो लगेच काढू नका, कारण कठोर स्क्रबिंगमुळे पुरळ उठू शकते; रंग लावल्यानंतर थोड्या वेळाने तो हलक्या हाताने धुवा.
रंग खेळून झाल्यानंतर अंघोळ करताना साबण लावण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर नारळ किंवा बदाम तेल चोळा, जेणेकरून रंग काढण्यासाठी त्वचा जास्त घासावी लागणार नाही आणि रंग आपोआप निघेल.
त्वचेला आराम देण्यासाठी कोरफड किंवा चंदन असलेले सौम्य क्लीन्झर वापरा आणि अल्कोहोल किंवा कठोर रसायने असलेली उत्पादने टाळा.