आता सगळ्यांना कळेल ‘हू इज धंगेकर..’ असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा काल मुंबईत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलम गोऱ्हे, प्रकाश सुर्वे हे उपस्थितीत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आता लोकांना धंगेकर कोण आहे ते कळेल, असे ओपन चॅलेंज केले.


रवींद्र धंगेकर यांचा प्रवास नगरसेवकापासून आमदारापर्यंत झाला. ते एक आदर्श कार्यकर्ता आहेत. ते १० वर्ष शिवसेनेचे नगरसेवक होते. आता ते पुन्हा स्वगृही आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात. आता लोकांना कळेल who is dhangekar? पोटनिवडणूक गाजली. मात्र एवढं करून पण धंगेकरांनी बाजी मारली आणि तिथे त्यांनी दाखवून दिलं लोकसेवक म्हणजे काय असतं. रवींद्र धंगेकर यांचा सारखा आदर्श कार्यकर्ता असावा. आपल्याला शुभेच्छा, आपण स्वगृही आलेला आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “मी शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. त्यामुळे हे कुटुंब माझासाठी नवीन नाही. अनेक प्रभावी कामं शिंदेसाहेबांनी केली आहेत. सामंत साहेबांनी मला पुन्हा इथं आणलं. सामंतसाहेब मस्त जुळवाजुळव करतात. मला तर वाटतं घराघरात भांडणं झाली की तुम्हालाच न्ह्यायला हवं. या पुढे शिंदेसाहेब जे आदेश देतील ते आम्ही पूर्ण करू. शिवसेनेचं नाव उंचीवर नेण्याचं काम करू. शिंदेसाहेब कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाहीत.  

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत बोलताना who is Dhangekar असं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं होतं. ती पोटनिवडणूक रवींद्र धंगेकर जिंकले होते. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मिश्किल टिपण्णी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here