उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. सदर निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. नवी दरवाढ उद्या म्हणजेच शनिवारपासून लागू होणार आहे.
उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे, दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली, असे प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ यांनी सांगितले.
सध्याचे दर, वाढीव दर
गायीचे दूध – ५४-५६ : ५६-५८
म्हशीचे दूध – ७०-७२ : ७२-७४