अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी कठोर निर्बंध लागू! पाकिस्तानची चिंता वाढली!

अमेरिकेत प्रवेशासंबंधी एक मोठा प्रस्ताव तयार केला असून, त्याअंतर्गत काही देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे, तर काहींवर कठोर अटी लागू करण्यात येणार आहेत. या प्रस्तावामुळे पाकिस्तानसह अनेक देशांना मोठा धक्का बसला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये या नवीन प्रस्तावित धोरणाची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाने तयार केलेली ही यादी तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. पहिल्या श्रेणीतील देशांवर संपूर्ण व्हिसा बंदी लागू केली जाणार आहे, तर दुसऱ्या श्रेणीतील देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळवण्यासाठी कठोर अटींचा सामना करावा लागेल. तिसऱ्या श्रेणीतील देशांवर आंशिक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.


या यादीच्या पहिल्या श्रेणीत अफगाणिस्तान, क्युबा, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि येमेन यांचा समावेश आहे.

दुसऱ्या श्रेणीमध्ये पाकिस्तान, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार, दक्षिण सुदान, बेलारूस, रशिया, सिएरा लिओन आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे. पाकिस्तानसाठी ही चिंताजनक बाब आहे.

तिसऱ्या श्रेणीतील देशांवर आंशिक व्हिसा निर्बंध लादले जाणार आहेत. या यादीत अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा, बेनिन, भूतान, बुर्किना फासो, काँगो, वर्दे, कंबोडिया, कॅमेरून, चाड, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, डोमिनिका, इक्वेटोरियल गिनी, गॅम्बिया आणि लायबेरिया यांचा समावेश असू शकतो.
या प्रस्तावित यादीमध्ये भारताच्या नावाचा समावेश नाही. याचा अर्थ भारतीय नागरिकांना अमेरिकेत जाण्यास कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here