हाउडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प चे दुसरे पर्व !

आंतरराष्ट्रीय राजकारणात आता बऱ्याच घडामोडी घडणार आहेत.. कारण सोमवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.. ट्रम्प 2 पर्व आता सुरू झालंय.. मेक अमेरीका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्टचा नारा देत त्यांनी निवडणुकीत बाजी मारली..
पहिल्या टर्म मधील चुका सुधारून ट्रम्प अमेरिकेसह अन्य देशांच्या प्रगतीला हातभार लावणार का, भारतासोबत ते कसे संबंध ठेवतील असे अनेक प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच अभ्यास करणाऱ्यांबरोबर सगळ्यांना पडले आहेत..
ट्रम्प सत्तेत येताच आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.. आपण एक एक गोष्टींचा विचार करू..
आता भारतावर याचा कसा परिणाम होणार ते पाहूया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे परस्परांचा उल्लेख ‘मित्र’ असा करतात. दोघांमधील मैत्रीचे धागे बळकट असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसले आहे; ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी आणि अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प या दोन प्रसंगांनी भारत हा अमेरिकेचा भक्कम दोस्त असल्याचं जगाला दाखवून दिलं होतं.. 2020 साली ट्रम्प यांच्या पराभवानंतर मोदींनी व्हाईट हाऊस मधला आपला मित्र गमावला..परंतु नाते संबंध पुन्हा जोडण्याची संधी त्यांनी गमावली नाही.. आताच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय होताच अभिनंदनाचा फोन करणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये मोदी होते.. ट्रम्प आणि मोदी या दोघांचे चांगले जमते आणि एकत्र येऊन आपण जागतिक पटलावर समान द्विपक्षीय कार्यक्रम राबवू शकतो असं दोघांना वाटतं.. त्यामुळे ट्रम्प अध्यक्षपदावर आल्याने अमेरिकेचे भारताबरोबरील संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता अधिक आहे..
ट्रम्प यांना अमेरिकेला पुन्हा महान बनवायचं आहे.. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य हे अमेरिकेला प्राधान्य हेच होते आणि आताही हेच राहिल यात काही शंका नाही.. तर इकडे पंतप्रधान मोदी यांना भारत आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक विश्र्वगुरू म्हणून उभा करायचा आहे.. मोदी सत्तेवर आल्यापासून भारताची आंतरराष्ट्रीय उद्दिष्टे बदलली.. जागतिक पटलावर भारताने नमतं घेणं सोडून तो अधिक ठाम झाला आहे..

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारतीय संरक्षण दलास मजबूत करण्यासाठी अमेरिकेने महत्त्व पूर्ण करार केले.. त्यामुळे दुसऱ्या कार्यकाळात ही संरक्षण दल अधिक बळकट होण्याची शक्यता आहे..
आर्थिक पातळीवर मात्र ट्रम्प यांचा भारताला वाईट अनुभव होता.. ट्रम्प यांनी भारताला tarriff किंग म्हणून हिणवलं होतं.. अमेरिकन उत्पादनावर भारत भरमसाट आयतशुल्क लावत असल्याचा आरोप ही त्यांनी केला होता..
ट्रम्प 2 राजवटीत स्थलांतरित आणि एच 1 व्हिसा धोरणवरून कठोर निर्बंध लावण्याची शक्यता आहे.. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना फटका बसण्याची शक्यता आहे…
काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन म्हणाले होते अगली बार ट्रम्प सरकार.. आता दंड थोपटत ट्रम्प पुन्ह सत्तेवर तर आले.. ट्रम्प यांची तिखट कार्यशैली कुणाला मान्य असो व नसो . आपली तलवार परजत आलेल्या ट्रम्प सरकारने जागतिक पटलावर अनेक सोंगट्या फिरणार हे मात्र नक्की.