अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात. चहासोबत अनेकांना बिस्किट, खारी, टोस्ट इत्यादी खायला आवडते. पण चहासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे. ते टाळले नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात!
सकाळ असो वा संध्याकाळ, अनेक भारतीय घरांमध्ये नाश्त्यासोबत चहा पिणे ही एक परंपराच आहे. आणि बहुतेकवेळा नाश्त्याला तळलेले पदार्थ असतात. हे तळलेले पदार्थ आधीच आरोग्यासाठी हानिकारक म्हणून ओळखले जातात, परंतु चहासोबत ते खाल्ल्याने पचन आणि पोषक तत्वांच्या शोषणावर अधिक परिणाम होऊ शकतो.
चहासोबत अनेकजण बिस्किटे आणि कुकीज खातात. ज्यामध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
चहासोबत खाल्ला जाणारा आणखी एक लोकप्रिय नाश्ता म्हणजे समोसा ज्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते.
ब्रेडसारखी इतर बेकरी उत्पादने देखील चहासोबत खाणे योग्य नाही कारण त्यात सोडियम, साखर आणि फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते.
चहासोबत दूध, पनीर किंवा मलई इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने चहामध्ये आढळणारे पॉलीफेनॉलचा परिणाम शरीरावर होत नाही.
चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.
आरोग्यदायी नाश्त्याच्या पर्यायांमध्ये तुम्ही ढोकळा, मखाना, चना चाट आणी खाकरा यासह रागी चिप्सचा समावेश करु शकता.