मुंबई (26/11) हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाने प्रत्यार्पणाविरोधात पुन्हा एकदा नवीन याचिका दाखल केली आहे. ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांना पाठवण्यात आली आहे. पुन्हा एकदा प्रत्यापर्ण थांबवण्यासाठी राणाने अपील दाखल केली. यापूर्वी न्यायमूर्ती एलेना कागन यांनी राणाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती. राणाने दावा केला आहे की, त्याला भारतात प्रत्यार्पण केले गेले तर त्याच्या जिवाला धोका आहे. राणा पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने आणि मुबंई हल्ल्यांशी संबंधित आरोपांमुळे त्याला छळ सहन करावा लागेल. तसेच त्यांनी खराब प्रकृतीचा हवाल देते याचिका दाखल केली आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राणाच्या प्रत्यार्पणला मानत्या दिली होती. ट्रम्प यांनी राणाला ‘धोकादायक दहशतवादी’ म्हणून संबोधले आहे.
दरम्यान अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय तव्वहुर राणाच्या याचिकवेर विचार करु शकते असे म्हटले जात आहे. या याचिकेवर 4 एप्रिल 2025 रोजी खाजगी परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. सध्या 63 वर्षीय राणा लॉस एंजेलिसच्या तरुंगात आहे. राणा पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) चा सदस्य आणि 26/11 हल्ल्याचा मास्टरमांइड डेव्हिड हेडलीचा जवळचा सहकारी असल्याचं मानले जाते.