माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. ब्लॉक वेळेत अप आणि डाउन मार्गावरील जलद लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल विलंबाने धावतील.
मेगाब्लॉकदरम्यान, रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने धावणार आहे. उद्या मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी / बेलापूर / पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या आपल्या कामाचे नियोजन या ब्लॉकच्या वेळा बघूनच घरा बाहेर पडा म्हणजे तुमची गैरसोय होणार नाही.