प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुणाल कामराविरोधातही अंधेरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.