तेव्हा साधा चहाचा ग्लास तरी फोडला होता का?…ठाकरे गटाचा शिंदे गटाला टोला

स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. ज्या ठिकाणी कुणाल कामराचा कार्यक्रम पार पडला, जिथे त्याने कविता सादर केली त्या मुंबईमधील खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी खार पोलिसांनी शिंदे गटाचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना ताब्यात घेतलं होतं. त्यापाठोपाठ आणखी २० जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात स्टुडिओमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावरून शिंदे गटाला व त्यांच्या कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “एकनाथ शिंदेवर टिका केली म्हणून स्टुडिओ फोडणारे कावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोललं गेलं, तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का? यांचं हिंदुत्व केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्यांपुरतं मर्यादित आहे का? असा टोला ठाकरे गटाने शिंदे गटाला लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here