कुणाल कामराच्या कवितेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक कविता म्हटल्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर आणि बंडखोरीवर विडंबनात्मक कविता सादर केली. मात्र यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. यामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून कुणाल कामरा याने देखील माफी न मागण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल कामरा याने याआधी पंतप्रधान मोदी, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण अशाच विडंबनात्मक कविता सादर केल्या होत्या. कुणाल कामरा याच्या बाजूने ठाकरे गट उभा राहिला. राज्यातील या प्रकरणावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुरु असलेल्या कुणाल कामरा गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कुणाल कामरा याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला आहे. कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणावरही वैयक्तिक हल्ला करावा”, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. पण दुर्दैवाने काही लोक समाजात आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत”, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here