आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये केकेआरच्या विजयानंतर मोठा बदल!

केकेआरने आयपीएलमध्ये पहिला विजय साकारला आणि त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये आता मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण राजस्थान रॉयल्सला आता पराभवानंतर अजून एक मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. या सामन्यापूर्वी केकेआरच्या संघाने एकच सामना खेळला होता. या सामन्यात केकेआरला आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता. आरसीबीने केकेआरवर मोठा विजय साकारला होता, त्यामुळे केकेआरचा रन रेटही फार कमी होता. त्यामुळे केकेआरचा संघ हा आठव्या स्थानावर होता.

पण आता दुसऱ्या सामन्यात केकेआरने राजस्थान रॉयल्सवर दमदार विजय साकारला आणि आपले गुणांचे खाते उघडले. त्यामुळे आता केकेआरचा संघ दोन गुणांसह सहाव्या स्थानावर विराजमान झाला आहे. राजस्थानला पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पराभूत केले होते. राजस्थानला केकेारकडून पराभव पत्करावा लागला. राजस्थान हा आता असा पहिला संघ बनला आहे, ज्यांना सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे राजस्थानला गुणांचे खाते उघडता आलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here