उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पार पडलेल्या महाकुंभमेळ्याला राहुल गांधींनी हजेरी लावली नाही. त्यामुळे राहुल गांधींवर भाजपच्या नेत्यांनी खूप टीका केली. दरम्यान, राहुल गांधींनी कुंभमेळ्याला का हजेरी लावली नव्हती? याचा खुलासा आता काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केला आहे. तसेच महाकुंभमेळ्याला न जाण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाचं रॉबर्ट वाड्रा यांनी समर्थनही केलं आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं की, “त्यांचं कुटुंब धर्माचं सार्वजनिक प्रदर्शन करण्यावर विश्वास ठेवत नाही. तसेच राहुल गांधींसारखे नेते अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे यात्रेकरूंना अडथळा निर्माण झाला असता किंवा त्यांची गैरसोय झाली असती”.
दरम्यान, तब्बल १२ वर्षांनी झालेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जवळपास ६६ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, राहुल गांधी हे या कुंभमेळ्याला न गेल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता या टीकेला रॉबर्ट वाड्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.