राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे.. जुलै ते डिसेंबर असे 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता या योजनेबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. तर जानेवारीचा हप्ताही आता जमा होत असून सात महिन्यांचे मिळून एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळतील. उद्यापर्यंत सगळ्या पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना..!
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) January 25, 2025
योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक २५ जानेवारी रोजी जवळपास १.३१ कोटी महिलांच्या खात्यात सन्माननिधी जमा करण्यात आला असून, आतापर्यंत एकूण २.४१ कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी… pic.twitter.com/q7jIEjr15J