आयपीएल सामन्यात दिल्लीचा हैदराबादवर दणदणीत विजय

दिल्ली कॅपिटल्सने सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट्सने मोठा शानदार विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाला सर्वबाद करत दिल्लीने २५ चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला. दिल्लीने सुरूवातीपासूनच सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला आणि अखेरीस विजय मिळवून गतवर्षीच्या सामन्यातील पराभवाचा व्याजासकट बदला घेतला. मिचेल स्टार्कचे पाच विकेट्स आणि नंतर प्रत्येक फलंदाजाने फलंदाजीत दिलेले योगदान यामुळे दिल्लीचा संघ हा सलग दुसरा विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.

अभिषेक पोरेलने १६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार लगावत दिल्लीचा विजय निश्चित केला. यासह दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत आरसीबीनंतर दुसरे स्थान गाठले आहे. दिल्लीच्या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट फिल्डिंग करत एकापेक्षा एक अनोखे झेल टिपले आणि या क्षेत्ररक्षणाच्या आणि पहिल्या डावातील कामगिरीच्या जोरावर दिल्लीने विजयाचा पाया रचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here