बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा वारसदार कोण असेल, यावर वाद सुरू आहे. काही जण त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना नैसर्गिक उत्तराधिकारी मानतात, तर काहींच्या मते या स्पर्धेत अन्य दावेदारही आहेत. राज ठाकरे यांनाही वैचारिकदृष्ट्या वारसदार मानतात तर एकनाथ शिंदे देखील या स्पर्धेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नाची चर्चा सुरू असताना, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर आपली प्रतिक्रिया दिली. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण – उद्धव ठाकरे, राज ठाकरे, की एकनाथ शिंदे? तेव्हा त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझे तिघांशीही चांगले संबंध आहेत.”बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी कोण, हा निर्णय शेवटी जनता घेईल. तिघेही माझे मित्र आहेत. राजकारण एक बाजूला आणि माझे व्यक्तिगत संबंध दुसऱ्या बाजूला आहेत.”
आणखी एका महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राचे चांगले मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? यावर नितीन गडकरी हसले आणि संयतपणे उत्तर देत म्हणाले, “दोन्हीही चांगले आहेत, पण माझ्या मते देवेंद्रजींनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे आणि ते अजूनही उत्कृष्ट काम करत आहेत.”