पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी निवड झालेल्या IFS निधी तिवारी आहेत तरी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने महिला सबलीकरण आणि महिलांचा विकास प्रयत्न करताना पाहायला मिळते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयामध्ये एक महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. वाराणसी येथील महिला अधिकारी निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधान कार्यालयात एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाराणसी येथे राहणाऱ्या 2014 च्या बॅचच्या आयएफएस (IFS) अधिकारी निधी तिवारी यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला कॅबिनेटने मंजूरी दिली आहे.
निधी तिवारी या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. नोकरी करता करता त्या यूपीएससीची तयारी देखील करत होत्या. त्यामध्ये यशवी झाल्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवा (IFS) मध्ये काम सुरू केले. या कालावधीत त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदऱ्या पार पाडल्या. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम केले. नोव्हेंबर 2022 मध्ये उपसचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी परराष्ट्र आणि सुरक्षा विभागात काम केले.

आयएफएस निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी म्हणून नियुक्ती झाली आहे. आता त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे नियोजन, सरकारी विभागाशी संपर्क करणे अशा अनेक जबाबदऱ्या त्यांच्यावर असणार आहेत. निधी तिवारी यांना पंतप्रधानांच्या खाजगी सचिवपदी बढती दिल्याने महिला सक्षमीकरणाचा संदेशही दिला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here