धक्कादायक! पुण्यातील ससून रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. दशरश सुरेश मेढे (वय ३१, रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

दरम्यान याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मेढे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानंतर त्याने कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. तो अस्वस्थ झाल्याने त्याला कुटुंबीयांनी ससून रुग्णालयात दाखल केले. तो वाॅर्ड क्रमांक ४० मध्ये उपचार घेत होता. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याने रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here