दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक गैरकारभार समोर!

गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेले पुण्यातील नामवंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातू महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मृत महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी, अशी अट घातली होती. मंत्रालयातून फोन करूनही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेवर उपचार केले नाही.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून चालवले जाते. रुग्णालय प्रशासनाने गेल्या सहा वर्षांपासून महापालिकेला एकही रुपयाचा कर भरलेला नाही. 2019-20 पासून रुग्णालयाने मिळकतकर भरण्याचे टाळत आहे. त्यामुळे महापालिकेची तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांची थकबाकी राहिली आहे.

एकीकडे रुग्णालय प्रशासन आर्थिक अडचणींचा दाखला देत गरजू रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करत आहे, तर दुसरीकडे स्वतःची आर्थिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. जरी धर्मदाय संस्थांना मिळकतकरात सवलतीचा दावा केला जात असला, तरी महापालिकेच्या नोंदींनुसार रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here