“जर रुग्णालय खंडणीची (अनामत रक्कम) मागणी करत असेल, तर रुग्णालयाच्या कर आणि महापालिकेच्या देयकांचे काय? ते कोट्यवधींमध्ये आहे! हे रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्टी आणि एजन्सींचे दरवाजे या यंत्रणा ठोठावतील का? हे रुग्णालय कोण चालवत आहे आणि ते इतके प्रभावी का आहेत की मुख्यमंत्र्यांना त्याचा बचाव करावा लागतो?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पुणे दीनानाथ रुग्णालयाच्या गर्भवती मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मिडिया साईटवर पोस्ट केली आहे त्यात हे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
“ज्या संस्थेने प्रसूतीसाठी एका महिलेकडून १०,००,००० रुपये मागितले होते, त्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चालवणाऱ्या ट्रस्ट आणि संस्थेविरोधात मुख्यमंत्री फडणवीस कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.“गर्भवती महिलेचे नातेवाईक ही खंडणी देण्यास असमर्थ ठरल्याने तिचा मृत्यू झाला. पण प्रश्न असे आहेत की, (अनामत रक्कम मागितल्याचा) अंतर्गत समितीने आरोप फेटाळला तरी काल एका डॉक्टरने कबूल केले आणि पदाचा राजीनामा दिला. रुग्णाला न वाचवता स्वतःचा बचाव करण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी रचणाऱ्या रुग्णालयावर पुणेकर विश्वास कसा ठेवू शकतात?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.