माजी भारतीय क्रिकेटर केदार जाधवने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी केदार जाधवला भाजपाचं सदस्यत्व दिलं. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याने मला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे काम करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली.
“2014 पासून, जेव्हापासून केंद्रात भाजप सरकार सत्तेत आलं आहे त्यांना मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा तसंच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी काम करणे आहे. मला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन असा मला पूर्ण विश्वास आहे,” असं केदार जाधव म्हणाला.