अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टँकोविक हिचा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या याच्याशी जुलै 2024 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर नताशा स्टँकोविक ही तिच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आली आहे. यात तिने ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले आहे.
अभिनेत्री नताशा स्टँकोविक हिने काहीच दिवसांपूर्वी मुलाखतीतून आपण घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात पडण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नताशाने बुधवारी इंस्टाग्राम एक स्टोरी पोस्ट केली होती. यात लिहिले की, ‘पुन्हा प्रेमात पडल्यावर चांगले वाटते’. तसेच तिने एका ऑफिशियल इंस्टाग्राम आयडीला सुद्धा टॅग केले. नताशाच्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.

नताशाने ‘पुन्हा प्रेमात पडल्यावर चांगले वाटते’ या आशयाची पोस्ट करून त्यावर @officiallyvaddy ला टॅग केले आहे. आता हे अकाउंट नेमकं कोणाचंय याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकतता आहे. काही दिवसांपूर्वी असे सुदधा म्हटले जात होते की हे अकाऊंट अभिनेता रणबीर कपूरचे आहे आणि तो लवकरच इंस्टाग्रामवर येणार आहे. सेलिब्रिटींकडून अशा पोस्ट करून त्याची लॉन्चिंग करण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.