उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या लेकाचा अलीकडेच साखरपुडा पार पडला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा पुण्यात साखरपुडा झाला. जय पवार यांचे लग्न ठरल्यानंतर आता पार्थ पवार यांचे लग्न कधी अशा चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता पार्थ पवार यांचे वडील म्हणजेच अजित पवार यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.
जय पवार हे अजितदादांचे धाकटे चिरंजीव आहेत. उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत त्यांचे लग्न ठरले आहे. 10 एप्रिल रोजी पुण्यातील घोटावडे येथील अजित पवारांच्या फार्महाउसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला आहे. लवकरच दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. जय पवारांनंतर पार्थ पवार कधी लग्नबंधनात अडकणार, याची चर्चा असतानाच अजितदादांनी यावर उत्तर दिलं आहे.
अजित पवार हे आज पुण्यात उपस्थित होते. तेव्हा त्यानी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. तेव्हा त्यांना पार्थ पवार यांच्या लग्नाबाबत विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ‘आता जयने त्याचं ठरवलं पार्थने ठरवलं की त्याचं करू’, असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.