मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. पण त्याआधी सराव सामन्या दरम्यानचा संघाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल आला आहे. यामध्ये मैदानात वादळ आल्याचे दिसून येत आणि त्यात रोहित शर्मा मजा करता दिसत आहे. रोहित शर्मा संघातील इतर खेळाडूंना मैदानातून परत बोलावतानाही दिसला. त्याने त्यावेळी मजेशीर पद्धतीने कॅमेरामनलाही ऑर्डर देताना दिसत आहे. याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ पुढच्या सामन्यासाठी सराव करत असताना मैदानात वादळ आले. सगळीकडे वारा सुटला होता. यावेळी रोहित शर्मा मैदानाबाहेर उभा राहून खेळाडूंना हाक मारताना दिसला. दरम्यान, रोहित शर्माने वादळाकडे बोट दाखवत कॅमेरामनला म्हटले, ‘अअरे, तू माझ्याकडे काय घेत आहेस, तिकडे बघ….’ रोहित सांगत होता की माझ्याकडे कॅमरा जाण्यापेक्षा तिकडचे दृश्य कव्हर जर. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.