छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम यांची साक्ष असलेले किल्ले पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात. परंतु आपल्या महाराष्ट्रतील काही तरुण शिविगाळ पर्यटकांना कारायला लावत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल होतोय. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचं काम काही टवाळ तरुण करताना दिसत.आहेत.
न्यूझीलंड देशातून आलेला पर्यटक सिंहगड किल्ला सर करत होता. त्यावेळी त्याला काही महाराष्ट्रतील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आलो आहेत, कसे आलो आहोत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी विदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिविगाळ करण्यास सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून पर्यटकाने शिविगाळ केली. मात्र शिवीगाळ करत असताना आपण काहीतरी चुकीचं बोलत असल्याचं पर्यटकाला जाणवलं. कारण विदेशी पर्यटक बोलत असताना तरुणांमध्ये हास्याचा कल्लोळ होता.
अतिथी देवभव आपली ही महाराष्ट्रची संस्कृती सांगते पण महाराष्ट्रातील तरुणांनी पर्यटकाला महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करण्यास भाग पाडले. अशी खंत त्या पर्यटकाच्या मनात उद्भवली. त्यामुळे ‘येथे पुन्हा येणार नाही’ असा त्या पर्यटकाने त्याचा व्हिडिओमध्ये उल्लेख केलाय.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी हा व्हि़डीओ एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. व्हिडीओत दिसणाऱ्या,टवाळकी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे.