वाराणसी सामूहिक बलात्काराचा तपास आता सेक्स रॅकेटकडे वळला

वाराणसीमध्ये 23 नराधमांच्या वासनेच्या शिकार झालेल्या, सामूहिक बलात्कार पीडितेच्या प्रकरणाचा तपास आता सेक्स रॅकेटकडे वळलाय. पोलिसांनी अटक केलेल्या 23 पैकी 12 मुलांचे मोबाईल फोन तपासण्यात आले. यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाराणसी पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये तब्बल 546 मुलींचे नग्न व्हिडिओ आणि फोटो आढळले. एवढेच नव्हे तर ज्या लोकांसोबत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह 6 राज्यांमध्ये आढळलंय. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांत हे व्हिडीओ फिरवले गेले. सामूहिक बलात्काराचे धागेदोरे केवळ 23 आरोपींपुरते मर्यादित नाहीत तर ते 6 राज्यांशी जोडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

गुन्ह्याचा सूत्रधार अनमोल गुप्ता असल्याचे समजले असून त्याला अटक करण्यात आली आहे. तो एका कॉन्टिनेंटल कॅफेचा मालक आहे. अनमोल गुप्ताकडून जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमध्ये मुलींचे सर्वात आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले. हे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून डाउनलोड केलेले नसून तर त्यांच्या कॉन्टिनेंटल कॅफेमध्ये बनवण्यात आले आहेत. पोलिसांनी हे व्हिडीओ, फोटो फॉरेन्सिक तपासणीसाठी आग्रा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहे. अनुपम गुप्ता हा नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना पाठवत असे. जुन्या ग्राहकांपासून नवीन ग्राहक तयार करण्याची साखळी तो चालवाचा. अनुपमच्या मोबाईल फोनमध्ये एक डेटाशीटदेखील सापडली. ज्याने या थ्योअरीला दुजोरा मिळाला आहे.

माझे वडील शरद गुप्ता देखील सेक्स रॅकेट माफियाचा भाग आहेत. असे अनमोलने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. 2022 मध्ये अनमोलला त्याचे वडील शरद गुप्ता यांच्यासह सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here