सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्ष! नवे सरकार अलर्ट मोडवर

सीरियामध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. हिजबुल्लहाने सीरियामध्ये घुसखोरी करत पुन्हा एखदा नवीन सरकार विरोधात बंड पुकारला आहे. 12 एप्रिल रोजी HTS चे नवे सैन्य आणि हिजबुल्लाहच्या लढवय्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. हिजबुल्लाहने पुन्हा एकदा सीरियात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळे सध्या सीरीयाचे नवे सरकार अलर्ट मोडवर आहे.

हिजबुल्लाहला इराणकडून मोठ्या शस्त्रास्त्रांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक पुरवठ्याचे मार्ग हिजबुल्लाहच्या नियंत्रणाखाली आले आहेत. यामुळे नव्या सीरियान सैन्याने हिजहुल्लहा विरोधात लष्करी कारवाई सुरु केली आहे. यामध्ये सीरियाच्या सैन्याने हिजबुल्ल्हाच्या तळांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सीरियात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. एकेकाळी हिजबुल्लाहचा सीरियामध्ये मोठा प्रभाव होता. परंतु अल-जुलानी नेतृत्वाखाली असलेल्या हयात-तहरीर अल-शाम (HTS) या गटाने हिजबुल्लावर हल्ले करुन सीरियामधून माघार घेण्यास भाग पाडले. दरम्यान पुन्हा एकदा हिजबुल्लाहने सीरियामध्ये आपली घुसखोरी सुरु केली आहे.

HTS चे प्रमुख अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आणि लष्कर स्थापन करण्यात आले आहे. परंतु, नवे सीरियन सेना हिज्बुल्लाहला रोखण्यात अपयशी ठरली, तर हिज्बुल्लाह पुन्हा एकदा सीरियामध्ये शक्तिशाली बनू शकतो. ही स्थिती सीरियन सरकारसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here