आरोग्य विभागाचे अपघातग्रस्त रुग्णांसाठी महत्वाचे निर्णय

राज्याच्या आरोग्य विभागानं अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखांपर्यंत कॅशलेस उपचारांचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आयुष्यमान भारत समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय आणि त्यातील लक्षवेधी मुद्दे खालीलप्रमाणे.

अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, रूग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार. दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक. योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार. आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार व सेवा केंद्रांची मदत घेणार.सदर योजनेत कोणताही गैरप्रकार आढळल्यास हे गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here