पावसाळा मुंबईकरांना अगदी नकोसा होतो. पावसाने जोर धरल्यानंतर मुंबईकरांची दाणादाण उडत असते. त्यात समुद्राला मोठी भरती आल्यास मुंबई तुंबण्याचीही शक्यता असते. यंदा १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १८ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. यापैकी जून आणि जुलै या कालावधीत सर्वाधिक मोठी भरती येणार असून यामध्ये ४.७३ मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. चार महिन्यांत १८ मोठ्या भरतीत जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
मोठ्या लाटांची सविस्तर माहिती पाहुया
२४ जून : स.११.१५ वा., ४.५९ मी
२५ जून : दु.१२.०५ वा., ४.७१ मी
२६ जून : दु.१२.५५ वा., ४.७५ मी
२७ जून : दु. १.४० वा., ४.७३ मी
२८ जून : दु. २.२६ वा., ४.६४ मी
२४ जुलै : स.११.५७ वा., ४.५७ मी
२५ जुलै : दु.१२.४० वा., ४.६६ मी
२६ जुलै : दु. १.२० वा., ४.६७ मी
२७ जुलै : दु.१.५६ वा., ४.६० मी
१० ऑगस्ट : दु १२.४७ वा., ४.५० मी
११ ऑगस्ट : दु. १.१९ वा., ४.५८ मी
१२ ऑगस्ट : दु.१.५२ वा., ४.५८ मी
२३ ऑगस्ट : दु.१२.१६ वा.,४.५४ मी
२४ ऑगस्ट : दु.१२.४८ वा., ४.५३ मी
८ सप्टें : दु.१२.१० वा., ४.५७ मी
९ सप्टें : दु. १२.४१ वा., ४.६३ मी
९ सप्टें : म.रा.१.१५ वा., ४.५९ मी
१० सप्टें : दु.१.१५ वा., ४.५७ मी
११ सप्टें : म.रा.१.५८ वा., ४.५९ मी
राज्यात सध्या पावसाची चिन्हे दिसत नाहीत. राजस्थान, गुजरातहून येणाऱ्या वाऱ्यांनी वातावरणाचा ताप अधिक वाढला असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.