भारताची समुद्रात ताकद आणखी वाढणार आहे. नवीनतम स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस (INS) तुशील लवकरच भारतात दाखल होत आहे. हे फ्रिगेट 17 डिसेंबर 2024 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथून भारतासाठी रवाना झाले. तुशील रशियामध्ये तयार करण्यात आले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नौदलात कार्यान्वित करण्यात आले होते. भारताच्या या यशामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेले व्लादिमीर पुतिन यांनी ही अनोखी भेट भारताला दिली आहे.

INS तुशीलची वैशिष्ट्यं काय आहेत?
तुशील म्हणजे अभेद्य कवच म्हणजेच म्हणजेच संरक्षक कवच. या युद्धनौकेचे घोषव्याक आहे निर्भय, अभेद्य आणि मजबूत.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सुसज्ज असलेली ही युद्धनौका शत्रूचे रडार चुकवून हल्ला करण्यास सक्षम आहे. आयएनएस तुशीलचे वजन ३ हजार ८५० टन आहे. या युद्धनौकेची लांबी ४०९.५ फूट आहे.
ही युद्धनौका १८ अधिकाऱ्यांसह १८० सैनिकांना घेऊन ३० दिवस समुद्रात तैनात राहू शकते. ही युद्धनौका इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सुसज्ज आहे. INS तुशील हे युद्धाच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये चार आयामांमध्ये (हवा, पृथ्वी, पाणी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक) ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
