न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? त्यांना कोणी यासाठी प्रवृत्त केले का? यासंदर्भात पोलिस तपास वेगाने सुरु आहे. आता या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटकही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती. यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.