आता एटीएम मध्ये सोने टाका आणि पैसे मिळवा! वाचा कुठे नेमकी ही सुविधा

शांघायमधील एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये एक अनोखे एटीएम बसवण्यात आले आहे. हे शांघायमधील पहिले सोन्याचे एटीएम आहे. जगात सोन्याच्या किमती वाढत असताना, हे छोटे यंत्र लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.

स्थानिक माध्यमांनुसार, या एटीएममध्ये नेहमीच लोकांची गर्दी असते. हे एटीएम १२०० अंश सेल्सिअस तापमानात सोने वितळवते, सोन्याची शुद्धता तपासते आणि थेट किंमत देखील दाखवते. तुम्ही बँकेतून पैसे देखील ट्रान्सफर करू शकता.

या एटीएममधून सोन्याचे व्यवहार करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम हे यंत्र सोन्याचे वजन करते. ते सोने ९९.९९% शुद्ध आहे की नाही हे तपासते. मग मशीन शांघाय गोल्ड एक्सचेंजच्या लाईव्ह रेटनुसार पैशांची गणना करते. यातून एक छोटे सेवा शुल्क वजा केले जाते. एका युजरने गोल्ड एटीएमचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पोस्ट केला आहे. ‘वाह! आशा आहे की लवकरच आपल्याला भारतातही सोन्याचे एटीएम दिसेल, असे कॅप्शन या व्हिडीओ दिलं आहे. दुसऱ्या एका युजरने गमतीने म्हटले की हे भारतासाठी एक उत्तम उत्पादन आहे. पण चोरांचं काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here