३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू

पुण्यातील तरुणीचा झिपलाईन करताना मृत्यू झाला आहे. झिपलाइन करताना ३० फूट उंचीवरुन कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना भोर तालुक्यात घडली आहे. तरुणीचे वय अवघे २८ वर्ष असून ती कुटुंबासोबत पिकनिकसाठी वॉटरपार्कला गेली होती. तरल अटपाळकर अस मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरल अटपाळकर ही तिच्या कुटुंबासह राजगट वॉटरपार्कमध्ये गेली होती. तिथे असलेल्या झिप लाइन हा खेळ तिच्या जीवावर बेतला. झिपलाईन करण्यासाठी ती ३० फूट उंचीवर गेली. रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण रेलिंगपर्यंत हात न पोचल्याने ती लोखंडी स्टूलवर उभी राहिली मात्र तिचा पाय सटकला आणि ती ३० फूट उंचीवरुन खाली कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here