महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. अशातच मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला. त्या संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं. यापूर्वी ही अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तेव्हा सुध्दा अनेकांनी याला विरोध केला आणि आताही अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयाला विरोध केला. पण खर म्हणजे मंदिरांच पावित्र्य राखण्यासाठी काय घालून जायचं काय नाही याचं भान आपल्याला असायला हवं. आणि ते भान आपण राखत नसू तर मंदिर प्रशासनाने नियम घालून दिले तर काय चुकलं. यावरचा हा खास व्हिडिओ नक्की पहा.